सिदनाक_महार

#सिदनाक_महार 

मी मिलिंद इनामदार(सरकार)
भिमाकोरेगाव युध्दातील सर सेनापती सिद्धनाक महार यांचा थेट वंशज असून 21 व 22 मार्च 1920 साली झालेल्या पहिल्या ऐतिहासिक माणगांव परिषदेचे स्वागत अध्यक्ष दादासाहेब(राजेसाहेब) इनामदार यांचा नातू आहे,1739 साली छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू सातारा गादीचे छत्रपती शाहू महाराज यांनी सर सेनापती सिद्धनाक महार यांना सांगली जिल्यातील मिरज तालुक्यातील कळंबी हे 900 ऐकर चे गाव इनाम दिले होते या गावीच मी वास्तवास असतो,माझ्या माहिती
नुसार हे भारतातील एकमेव गाव असेल जिथे आज ही आम्हाला सरकार असे संबोधले जाते आपण देव मानत नाही पण कळंबी या गावी जितके धार्मिक मंदिरे आहेत त्या सर्व धार्मिक मंदिराचा मी सिद्धनाक महार यांचा थेट वंशज असल्याने मी एकमेव ट्रस्टी आहे,पिढ्यान पिढ्या आम्हाला इथे खूप मान पान आहे त्याचे वर्णन मी इथे मुद्दाम करण्याचे टाळतो आहे,,
          आजपर्यंतच्या इतिहासात आपल्या जातीला खूप गौरशाली इतिहास लाभला आहे छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा छत्रपती संभाजी महाराज असोत 
आपल्या पूर्वजांनी यांच्या बाजूने प्रामाणिकपणे व अगदी निधड्या छातीने लढून अनमोल अशी ऐतिहासिक कामगिरी केली आहे यात अनेक नावे घेता येतील त्यातील पहिले नाव आहे सिद्धनाक महार,रायाप्पा महार गोविंद गोपाळ महार,रायनाक महार,जिवा महार अशा कर्तबगार महार योध्यांची  मालिका खूप मोठी आहे,,,
     मी सिद्धनाक महार याचा वंशज असल्याने मी इथे फक्त सिद्धनाक महार याच्यावर लिहीत आहे,,,पूर्वीच्या आपल्या पिढीत एक प्रथा चालत आली होती की घरात मुलगा जन्मला  की  त्याला आजोबांचे नाव देत असत व मुलगी जन्मली  की तिला आजी चे नाव  ठेवत असत,योगायोगाने आमच्या घराण्यात जास्त करून मुलांनीजन्म जन्म घेतला आणि प्रथे प्रमाणे त्याची नावे आजोबांचे नाव म्हणजे सिद्धनाक असे ठेवण्यात आले,हे तिन्ही ही सिद्धनाक खूप पराक्रमी होते त्याचा प्रत्येकाचा इतिहासात खूप काही ऐतिहासिक युद्धे झाली त्यामुळे या तिन्ही सिद्धनाकांची नावे सुवर्ण अक्षरांनी इतिहासात नमूद झालेली आपणास आढळतात,मी इथे फक्त भिमाकोरेगाव मधील सर सेनापती सिद्धनाक महार यांच्या विषयी माहिती लिहीत आहे,,
         सर सेनापती सिद्धनाक महार यांची  500 शूर महार योध्यांची  फौज होती, 1795 मध्ये खर्डा येथे मोगल व दुसरा बाजीराव पेशवा यांच्यात एक घनघोर युद्ध झाले या युद्धात बाजीराव पेशवे याचे सेनापती होते परशुराम भाऊ पटवर्धन हे युद्ध सुरू होण्यापूर्वी एक किस्सा घडला सर्व योध्यांचे  तंबू युद्ध भूमीच्या बाजूला लागले होते त्यात परशुराम भाऊ पटवर्धन यांच्या तंबू जवळच सिद्धनाक महार यांचा तंबू होता,हा तंबू इथून हटवावा कारण तो महार योध्यानच आहे  अशी तक्रार काही ब्राम्हण योध्यांनी होरोजी पाटणकर यांच्याकडे केली,त्यावेळी हिरोजी पाटणकर 
यांनी त्यांना सांगितले की ते जरी महार योद्धे असले तरी त्यांचा पराक्रम महान आहे या काय जेवणाच्या पंगती नाहीत,ही बातमी जेव्हा सिद्धनाक यांना समजली तेव्हा रागाने हिरोजी पाटणकर यांना म्हणाले की आम्ही इतके वर्षे आपल्या बाजूने लढत आहोत अनेक युद्धे आम्ही आमच्या पराक्रमाने आपणास जिंकून दिली आहेत तरी आपण आमचा तिरस्कार करता?आमची आज ही आपणास घृन्हा वाटते?आज या लढाईत आमचा पराक्रम पहा,,,असे म्हणत ते तिथून रागाने बाहेर पडले,,जेव्हा दुसऱ्या दिवशी मोगल सैन्याने या लढाईचे सेनापती परशुराम भाऊ यांना चहूबाजूने घेरले असता त्याच्यावर सिद्धनाक महार यांनी असा काही हल्ला केला की ते मोगल सैनिक ही सिद्धनाक महार यांच्या या हल्ल्याचा प्रतिकार करू शकले नाहीत,सेनापती परशुराम भाऊ यांचे प्राण वाचवून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवून या लढाईची सारी जबादारी सिद्धनाक यांनी घेतली व या लढाईत बाजीराव पेशवा याना विजयी मिळवून दिला,,हा खर्डा लढाईचा इतिहास लिहिणे गरजेचे होते कारण इथूनच सिद्धनाक महार व बाजीराव पेशवे यांच्यात वादाची खरी ठिणगी पडली व यांचेच रूपांतर नंतर 1818 च्या ऐतिहासिक भिमाकोरेगाव युद्धात पेशवाई गाडून टाकण्यात झाले,,,
        या युद्धा नंतर सिद्धनाक महार यांनी बाजीराव पेशवे यांच्या बाजूने एक ही युद्ध लढले नाही,,इंग्रज व बाजीराव पेशवे यांच्यात नंतर 1795 ते 1818 या कालावधीत अनेक युद्धे झाली आहेत त्या प्रत्येक युद्धात बाजीराव पेशवे यांचा पराभव झालेला आहे,1795 ते 1818 चे ऐतिहासिक भिमाकोरेगावचे युद्ध  या मध्ये बऱ्याच अशा घटना घडल्या आहेत की त्या सर्व घटनांचे वर्णन केले तर हा लेख खूप मोठा होईल म्हणून मी त्या टाळत आहे,,पण एक गोष्ट या कालावधीत  बाजीराव पेशवा जवळ जवळ हुकूमशाह झाला होता,सर्वच जाती धर्मातील जनतेला तो खूप छळत असे,खास करून आपल्या महार जातीवर त्याने अनेक निर्बंध लावले होते,काय निर्बंध लावले होते ते आपल्या सर्वांना माहीतच आहेत कारण भिमाकोरेगावचा सर्व इतिहास आपल्या डोक्यात फीडच आहे,,, खरं आहे ना हे,,,,
 सर सेनापती सिद्धनाक महार हे इंग्रजांच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेण्यापुर्वी बाजीराव पेशवे यांना भेटावयास गेले होते त्यांनी बाजीराव पेशवे यांना विनंती केली होती की आपण आमच्या समाजावर ते मानव जातीला ही शरमेने मान खाली घालावी लागेल अशा ज्या प्राणघेण्या जुलमी अटी व शर्थी लावल्या आहेत त्यामागे घ्याव्यात आज ही आम्ही आपल्या बाजूने लढण्यास तयार आहोत आमच्या समाजाला आपण लावलेल्या सर्व जाचक निर्बंधातून मुक्त करून आम्हाला सन्मानाची वागणूक द्यावी आम्हाला माणूस म्हणून माणसाप्रमाणे जगू ध्यावे बस आपण इतके करा आम्ही त्या इंग्रजाणा आपल्या बाजूने लढून या देशातून पळवून लावतो 
पण बाजीराव पेशव्यांनी ही सिद्धनाक यांची विनंती धुडकावून लावली व त्यांनी उलट सिद्धनाक यांना तंबी दिली की आपण किती ही शूर असा पण आमचे गुलाम आहात व गुलामच रहाणार सुईच्या टोकावर जे अनु असतात तितका सुद्धा मानसन्मान आम्ही आपणास देऊ नाही शकणार,,,या भेटीनंतर सिद्धनाक महार व त्याच्या 500शूर सैनिकांनी इंग्रजांच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतला व 1 जानेवारी 1818 ला आपल्या पूर्वजांणी पेशवाई कायमस्वरूपी गाडून टाकली हा आमचा सत्य  इतिहास आहे,या युद्धानंतर शनिवारवाढयात बंदीस्त असलेले प्रतापराव भोसले याची जेव्हा सर सेनापती  सिद्धनाक महार यांच्या विनंतीस मान देऊन इंग्रजांनी सुटका केली तेव्हा प्रताराव भोसले यांनी सर सेनापती याचे आभार मानले व ते म्हणाले सांगा आपणास मी काय इनाम देऊ तेव्हा सिद्धनाक यांनी त्यांना नम्रपणे सांगितले की आपल्या पूर्वजांणी आम्हाला यापूर्वीच कळंबी हे गाव इनाम दिलेले आहे आता आपणास आमच्यासाठी काय करण्याची प्रबळ इच्छा असेल तर आमच्या समाज्यातील मुलांना शिक्षण घेण्यासाठी आपण शाळा सुरू कराव्यात व त्यांना तिथे शिक्षण घ्यावे ही  सर सेनापती सिद्धनाक यांची विनंती त्यांनी मान्य केली व काय योगायोग पहा पुढे बाबासाहेब आंबेडकर हे प्रतापराव भोसले या सातारा येथील शाळेत दाखल झाले होते,,,,,, 
        या ऐतिहासिक विजयानंतर  च आपण माणूस म्हणून माणुसकीचे जीवन जगू लागलो,माणूस म्हणून माणसात मिसळू लागलो,आपल्यासाठी शैक्षणिकद्वारे खुली झाली,आपण शिक्षण घेऊ लागलो अंगावर चांगली वस्त्रे आली,,,,,
         भिमाकोरेगावचा इतिहास जितका महत्वाचा आहे तितकाच Dr, बाबासाहेबांच्या जीवनाची राजकिय जीवनाचा प्रवास सुरु करणाऱ्या 21 व 22 मार्च 1920 साली कोल्हापूर नगरीचे छत्रपती शाहू महाराज यांच्या पुढाकाराने झालेल्या माणगांव परिषदेचा इतिहास ही तितकाच महत्वाचा आहे असे मला वाटते कारण या माणगांव परिषदे नंतरच Dr, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राजकीय जीवनाची  सुरवात केली आहे  या माणगांव परिषदेचा इतिहास ही खूप मोठा आहे कारण ज्यावेळी छत्रपती शाहू महाराज यांनी या परिषदेची घोषणा केली त्यावेळी बाबासाहेब हे फक्त 29 वर्षाचे होते छत्रपती शाहू महाराज हे नेहमीच त्यांना शिक्षण घेण्यासाठी नेहमीच आर्थिक मदत करीत असत,छत्रपती शाहू महाराज यांना आपण दूरदृष्टी लाभलेला राजा असे संबंधतो ही त्यांना प्राप्त झालेली पदवी किती योग्य होती हे या माणगांव परिषदेतून सिद्ध होते,बाबासाहेबाना दलितांचे नेते घोषित करण्याचा निर्णय छत्रपती शाहू महाराज यांनी घेतला त्यासाठी त्यांनी माणगांव परिषदेचे आयोजित केली होती 21 व 22 मार्च 1920 ही तारीख निश्चित केली गेली कोणत्याही परिस्थितीत ही परिषद यशस्वी करून छत्रपती शाहू महाराज यांना दलितांचे नेते म्हणून बाबासाहेबांचे नाव पुढे आणायचे होते  ही परिषद यशस्वी होण्यासाठी एक महिना आधी शाहू महाराजांनी आपल्या राजवाड्यावर महाराष्ट्र मधील सर्व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक व राजकीय नेते मंडळीसाठी शाही भोजनाची व्यवस्था केली होती सकाळी 10 वाजले पासून संपूर्ण  महाराष्ट्रतुन लोक येण्यास सुरुवात झाली स्वता शाहू महाराज येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वागत करत होते व त्यांना ही माणगांव परिषद यशस्वी होणे किती आवश्यक हे समजून सांगत होते  रात्रीचे 8 वाजले पण शाहू महाराज लोकांचे स्वागत करण्यात मग्न होते लोक येतेच होते जेवत होते पण महाराज रात्री 8 वाजले तरी जेवले नव्हते रात्री 8,30 च्या दरम्यान काही साध्या वेशातील व सर्वसाधारण दिसणारी मंडळी तिथे दाखल झाली त्यांना पाहून महाराजानी त्याचे स्वागत केले  व त्यांच्या सोबत बोलत बोलत जाऊन जेवणासाठी बसले गप्पा रंगल्या वाडप्यानी जेवणे वाढली पण जेवण वाढत असताना वाढप्याना एक प्रश्न पडला होता की ही साध्या वेशातील मंडळी कोण आहेत की ज्याच्या सोबत महाराज मनसोक्त मनमोकळे बोलत आहेत? त्यांनी बाहेर  हे लोक कोण आहेत याची विचारपूस केली असता त्या वाढप्याना असे समजले की,,ही मंडळी सर सेनापती सिद्धनाक महार याचे वंशज आहेत, जेवणे झाली होती महाराज व ही मंडळी तिथेच बोलत उभी राहिली होती
जेवणे झाली तरी वाढपी ताटे उचलण्यास येत नाहीत ही गोष्ट छत्रपती शाहू महाराज यांच्या लक्ष्यात आली,त्यांनी स्व:ता ही ताटे उचलण्यास सुरवात केली तेव्हा सर्व वाढपी धावत धावत आली तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना खडे बोल सुनावले,,,,अरे ही माणसे कोण आहेत हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल म्हणून तुम्ही ही ताटे उचलण्यास टाळा टाळ करीत होता अरे ही मंडळी साधी सुधी नाहीत ही भिमाकोरेगाव युद्धातील सर सेनावती सिद्धनाक याचे वंशज आहेत हे समजल्यावर वाढप्यानी महाराज यांची माफी मागितली,
     सांगली जिल्हा पेक्षा कोल्हापूर जिल्हा सर्वच बाबतीत श्रेष्ठ होता पण छत्रपती शाहू महाराजांनी या माणगांव परिषदेचे स्वागत अध्यक्षपद  दादासाहेब इनामदार यांना स्वीकारण्याची विनंती केली त्यावेळी ते म्हणाले होते की,,मी या ऐतिहासिक माणगांव परिषदेचे स्वागत अध्यक्ष पद आपण स्वीकारावे अशी आपणास विनंती करीत आहे कारण मला पूर्ण खात्री व विश्वास    आहे की या परिषदेसाठी आपणच जास्तीतजास्त लोक संघठीत करू शकाल कारण समाजात आपला शब्द शेवटचा शब्द आहे व आपल्या शब्दाला एक आदरणीय मानसन्मान आहे
 आणि माझ्या आजोबांनी हा छत्रपती शाहू महाराज यांचा विश्वास सार्थ ठरवत त्यावेळी म्हणजे 21 व 22 मार्च रोजी या परिषदेसाठी 9 ते 10 हजार लोक यशस्वीपणे एकत्रित करून ही परिषद यशस्वी केली होती 🙏🏻🌺

*श्री. मिलिंद इनामदार (सरकार )*
यांची मूळ पोस्ट 

#भीमाकोरेगाव #सिदनाक #महार #छत्रपती #छत्रपतीप्रेमी #छत्रपतीशासन #छत्रपतीशिवराय #highlightseveryone #viralpost2025 # सौजन्य फेसबुक  कोल्हापूर संस्थान शाहूनगरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा