बहिर्जी नाईक

  शिवरायांच्या अनेक हिऱ्यांपैकी गुप्तहेर खात्यांचे प्रमुख बहिर्जी नाईक हे एक आहेत. त्यांनी गुप्त बातम्या काढून छत्रपती शिवरायांना पुरविल्यामुळे स्वराज्याचा विस्तार करण्याचा मार्ग सुकर झाला. बहिर्जी नाईक हे आपल्या सर्वाचे स्फूर्तिस्थान आहे

किल्ले बाणूरगड हा इतिहासात भूपाळगड किंवा भोपाळगड या नावाने ओळखला जातो, सांगली जिल्ह्यातील खानापूर व आटपाडी तालुका व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका अशा तीन तालुक्यांच्या सीमारेषेवर भूपाळगड उभा आहे. शिवकालात स्वराज्याच्या सीमारक्षेच्या दृष्टीने भूपाळगडास अनन्यसाधारण असे महत्त्व होते.

भूपाळगड हा किल्ला आकाराने विस्ताराने प्रचंड असला तरी एक तलाव, महादेव मंदिर, समाधी व जुजबी तटबंदी असे मोजके अवशेष शिल्लक आहेत.

बहिर्जी यांच्या नेतृत्वाखाली साधारण ३००० हेर कार्यरत होते असे इतिहासकार मानतात. हे हेरखाते इतके सक्षम होते की समकालीन इतिहास फंद फितुरीने भरलेला असूनदेखील शिवाजी महाराजांना मात्र संपूर्ण कारकिर्दीत एकदाही दगा फटका झालेला आढळून येत नाही.

राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याच्या गुप्तहेर खात्यात सामील केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते.

बाणूरगड महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये असलेला एक किल्ला आहे. हा किल्ला सांगली जिल्ह्याच्या पूर्व टोकास आहे. येथून पुढे सोलापूर जिल्हा सुरु होतो. मराठी स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची समाधी येथे आहे.

या जिल्हाल्यातील सर्वात श्रीमंत तालुका व दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणारा तालुका म्हणजे सांगोला , ज्या तालुक्याचे नाव गिनीज बुकात नोंद आहे असा हा तालुका . जो दोन गोष्टीसाठी ओळखला जातो . एक म्हणजे डाळींबा साठी व दुसरे म्हणजे एका तालुक्यावर सर्वात जास्त वेळा आमदार म्हणनू विधान सभेवर जे निवडून गेले भाई गणपतराव देशमुख यांच्यामुळे ओळखला जातो .

धार्मिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात महत्त्वाचा ठरतो 

येथे ६५ प्रकारचे पाणपक्षी असून, हिवाळ्यात येथे १४ जातींची रानबदके परदेशातून येतात. मध्य आशिया, सैबेरिया, चीन, युरोप येथून ही रानबदके येतात. ढोक, ढिबरा, कव्हेर जातीचे मासेही या तलावात मुबलकपणे आढळतात. सुप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ कै. सलीम अली यांचे हे आवडते ठिकाण होते. याच तळ्याच्या परिसरात १४ उपवनांसह स्मृतिवनही तयार करण्यात आले आहे. आम्रवन, चंपक वन, अशोक वन, गणेश वन इत्यादी उपवने सामाजिक वनीकरण खात्यामार्फत विकसित करण्यात आली आहेत. हे स्मृतिवन देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा