मदतीला अगणित
हात
सौजन्य Sangola Teacher Whatsapp
एकदा एक स्त्री
आपल्या आलिशान कारने हायवे वरून शहराकडे जात असते. अचानक तिची कार बंद पडते. आकाश
ही ढगांनी भरून आलेले असते. लगेच धो धो पाऊस पडतो. तिला गाडी दुरुस्त करण्याची
काहीच माहिती नसते.ती इकडे तिकडे मदतीसाठी कोणी आहे का ते पाहते तिला कोणीच दिसत नाही. मदतीसाठी इतर
गाडयांना हात दाखविते पण कोणताच गाडीचालक थांबत नाही.
बराच वेळ जातो आता मात्र तिच्या
डोळ्यात काळजीने पाण्याच्या धारा लागतात. तेवढयात शेखर नावाचा माणूस तिच्या जवळ
येतो. त्याला पाहून ती स्त्री प्रथम घाबरते .पण शेखर म्हणतो घाबरू नका ताई मी
प्रयत्न करून पाहतो आणि गाडी दुरूस्तीच्या कामाकडे वळतो.
थोडा वेळ प्रयत्न केल्यानंतर त्या स्त्रीची कार
सुरू होते. ती स्त्रि शेखरला खूप खूप धन्यवाद देते आणि शेखरला म्हणते "तुम्ही
माझी खूप मोठी अडचण सोडविली मी त्या बदल्यात सांगा तुम्हाला किती रुपये देऊ"?
तेंव्हा शेखर म्हणतो काही नको, हे माझे काम नव्हतेच मी तर तुम्हाला मदत केली. मलाही एका माणसाने मदत केली
होती आणि त्याचा कोणताही मोबदला त्यांनी न घेता आपणही इतरांना अशीच मदत करा असे
सांगितले आणी मी ही आपणास मदत केली. तुम्हीही अशीच मदत करा हाच माझा मोबदला समजा.
हे ऐकून त्या स्त्रिला खुप छान
वाटले आणि तिनेही हसत मी ही अशीच मदत नक्की करेन असे वचन देऊन हसतमुखाने निरोप
घेऊन निघून गेली.
ती वेटर ७ महिन्याची गरोदर आहे हे त्या
स्त्रिने हेरले व लगेच तिच्या मनात विचार आला आपण हिला मदत करायलाच हवी. हिला
सध्या पैश्याची खूप गरज असणार म्हणूनच ती गरोदर असतानाही काम करत आहे.
तिने तिच्या पर्समधून काही नोटा व एक
चिठ्ठी लिहून पॉकेट मध्ये ठेवली. जेवण झाल्यानंतर बील रक्कम व टिप म्हणून एक पॉकेट
त्या स्त्रि ने त्या वेटरच्या हातात दिले. काउंटरला तिने बिल दिले व पॉकेट उघडून
पाहिले तर त्यात एक चिठठी व काही नोटा होत्या.
तिने चिठ्ठी वाचली तर त्यात लिहीले होते
तु खूप उत्साही आहेस गरोदर असूनही ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देते. तुला खर तर आराम
करायला हवा पण तुला पैश्याची खूप गरज असल्याने तू काम करत आहेस . मलाही अशीच एका
माणसाने मदत केली म्हणून मी तुला मदत करत आहे. तु ही अशीच मदत कर. मदतीची ही साखळी
तोडू नकोस.
तिने त्या पॉकेटातील नोटा मोजल्या
तर त्यात चक्क दहा हजार रुपये निघाले.एवढी मोठी रक्कम पाहून तिच्या डोळ्यात पाणी
आले. तिने मनोमन त्या मदत करणाऱ्या स्त्रिला धन्यवाद दिले.
तिची कामाची शिफ्ट संपल्यानंतर ती
घरी गेली. घरी तिचा नवरा नेहमीसारखाच चिंतातूर होऊन काळजी करत होतो. ती नवऱ्याजवळ
त्याच्या मिठीत गेली व म्हणाली आता माझ्या डिलेव्हरीची काळजी नका करू आज मला एका
स्त्री ने खूप मदत केली आहे. घडलेला प्रसंग सांगितला दोघांनाही खूप आनंद झाला. तो
काळजी करणारा नवरा दुसरा तिसरा कोणी नसून तो असतो शेखर...
ह्यालाच म्हणतात 'क्रिया तशी प्रतिक्रिया' मित्रांनो नैसर्गिक न्याय
तत्व असतेच. आपण जे इतरांना द्याल तेच आपल्याला परत मिळते. आपणच जर दुसऱ्याला दुःख
दिले, त्रास दिला तर आपल्याला दुःख आणि त्रासच मिळणार. आपण जर दुसऱ्याला नेहमी मदत
केली, सुख दिले आनंद दिला तर आपल्यालाही
आनंद आणि सुख मिळणारा आपल्यालाही नेहमीच इतरांकडून मदतच मिळणार.
कितीही संकटे जिवनात आली तरी मदतीला
अगणित हात धावून येणार हे मी छातीठाकपणे सांगतो. म्हणून आपण नेहमीच दुसऱ्यांना सुख, आनंद देऊया मदत करुया...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा