जलाशयात परदेशी पाहुण्यांचे आगमन

 उजनी जलाशयात परदेशी पाहुण्यांचे आगमन

सांगोला महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाची अभ्यास सहल नुकतीच उजनी धरणाच्या जलाशयातील पक्षी बघण्यासाठी आयोजित करण्यात आली होती, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी फ्लेमिंगो पक्षांचे आगमन झाले आहे,, शेकडो फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी मोठ्या संख्येने जलाशयातील खाद्याचा आस्वाद घेत आहेत, सैबेरिया मधून हे पक्षी हजारोंच्या संख्येने भारतात येतात, आणि भारत भर विखुरतात,, तसेच ते महाराष्ट्रातील अनेक जलाशयात दाखल होतात, या पक्षांचा विहंगम नजारा पहाण्यासाठी राज्यभरातून अनेक पक्षी निरीक्षक पक्षी प्रेमी उजनी धरणाच्या जलाशयाला भेट देतात,, पक्षी निरीक्षणासाठी भिगवण जवळ दिकसळ हे गाव असून पुलाजवळ इतर अनेक पक्षी सहजपणे पहात येतात, शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागातील सेवानिवृत्त पक्षी निरीक्षक प्रा, डॉ, अरविंद कुंभार यांनी योग्य मार्गदर्शन केल्यामुळे आम्हाला फ्लेमिंगोचे निश्चित ठिकाण माहीत झाले, दिकसळ गावाजवळ सध्या मोटरबोट उपलब्ध असून प्रत्येकी100 रुपये प्रमाणे आकार घेतात,, दिकसळ गावापासून साधारणतः एक किलोमीटर अंतरावर फ्लेमिंगो पक्षी किनाऱ्यावर अत्यंत शांतपणे विसावा घेताना दिसतात, अगदी 100 फुटावरून आपल्याला फ्लेमिंगो चा लोभस नजरा पहावयास मिळतो,  सहलीतील मुलांच्या हालचाली मुळे सावध झाले,, आणि सर्व पक्षांनी हवेत झेप घेतली,, हा नजर इतका विलोभनीय होता की त्यांच्या पंखाच्या लालबुंद रंग आकाशात ज्वाला भडकाव्या असा भास होत होता, फ्लेमिंगो पक्षाच्या पंखाच्या आतील बाजूस असलेल्या रंगामुळेच अग्निपंखी असेही    संबोधले जातेजलाशयावर अनेक दुर्मिळ पक्षी पहावयास मिळतात,, तेव्हा कधी निघता हे परदेशी पाहुण्यांचे स्वागत करायला,  गरज वाटल्यास मी ही तुमच्या बरोबर असेन,, सर्व फोटो उजनी पाणलोट क्षेत्रातील आहेत,, नक्कीच तुम्हाला आवडतील,, प्रा, डॉ, विधिन कांबळे, प्राणिशास्त्र विभाग, सांगोला महाविद्यालया, सांगोला

सुभेदार रामजी मालोजी सकपाळ

सुभेदार रामजी मालोजी सकपाळ जन्मदिन*

जन्म - १४ नोव्हेंबर १८३८ (पुणे)

स्मृती - २ फेब्रुवारी १९१३ (मुंबई)

*प्रा. हरी नरके*

*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

सुभेदार रामजी मालोजी सकपाळ एक महान योद्धा होते. त्यांनी अफगाणिस्तानच्या युद्धात प्रत्यक्ष लढाई केलेली होती. त्यांच्यातील कुशल शिक्षकाचे गुण ओळखून ब्रिटीश सरकारने त्यांना पुण्याला पाठवून टिचर्स ट्रेनिंग दिले. त्याकाळात त्यांचा महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई यांच्याशी परिचय झाला. पुढे त्याचे रूपांतर घनिष्ट मैत्रीत झाले. शूद्र अतिशूद्रा मधून कोणी तरी महापुरूष जन्माला येईल आणि तो या घटकांची गुलामी संपवील असे फुले म्हणत असत. तसे त्यांनी आपल्या पुस्तकात भाकीतही वर्तवलेले आहे. आपल्या १४व्या अपत्याकडे, भीमाकडे, सुभेदार रामजी त्यादृष्टीने पाहात असत. त्यांना प्रथम पत्नी भीमाबाई पासून झालेल्या १४ मुलांमधली अवघी ६ जगली. बाळाराम, गंगा, तुळसा, मंजुळा, आनंद आणि शेंडेफळ भीमराव. रामजी इंदूर जवळच्या लष्कराच्या छावणीत शिक्षक होते. पुढे ते मुख्याध्यापक झाले. याच 'मिल्ट्री हेडक्वार्टर ऑफ वॉर' म्हणजेच MHOW महू मध्ये भिमरावांचा १४ एप्रिल १८९१ ला जन्म झाला. भिवा ३ वर्षांचा असताना ते लष्करातून निवृत्त झाले. काही काळ दापोलीला राहिल्यावर नोकरीच्या शोधात ते सातार्‍याला गेले. भिवाचे प्राथमिक शिक्षण सातार्‍यातच झाले. रामजी हे रामानंदी पंथाचे असल्याने त्यांच्यावर संत कबीर, संत तुकाराम आणि अन्य संतांच्या विचारांचा खोलवरचा प्रभाव होता. "आपले वडील गुणी शिक्षक होते. त्यांनी बालपणी आपल्यावर उत्तम संस्कार केले. धार्मिक बाबतीत ते रोमन हुकुमशहा सारखे वागत असत" असे बाबासाहेबांनी आपल्या शेवटच्या पुस्तकाच्या (बुद्ध आणि त्यांचा धम्म) प्रस्तावनेत नमूद केलेले आहे. १४ ऑक्टोबर १९५६ ला स्वत: बौद्ध धम्माची दिक्षा घेताना व लक्षावधी बांधवांना दिक्षा देताना बाबासाहेबांनी नागपूरच्या दिक्षाभुमीवर सर्वप्रथम सुभेदार रामजींना आदरांजली अर्पण केलेली होती. त्यांनी आपल्या मुलींना घरीच इतके उत्तम शिक्षण दिलेले होते. त्या सगळ्याजणी ग्रंथवाचन करीत आणि प्रसंगी धर्मग्रंथावर उत्तम प्रवचनंही देत असत असेही बाबासाहेबांनी नमूद केलेले आहे. संगीतप्रेमी बाळाराम फारसे शिकले नसले तरी त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व होते. आनंदरावला कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी शिक्षण अर्धवट सोडून नोकरी धरावी लागली. भिमरावला मात्र खूप शिकवायचे अशी रामजीबाबांची महत्वाकांक्षा होती. भिवा १९०७ साली मॅट्रीक झाल्यानंतर त्याला त्यांनी पुढे २ वर्षे महाविद्यालयीन शिक्षण दिले. 


आपल्या तुटपुंज्या पेन्शन मधून भागत नसतानाही त्यांनी त्यासाठी खूप हालअपेष्टा भोगल्या. भीमरावांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून रामजी दापोली आणि सातारा येथे काही वर्षे काढल्यानंतर मुंबईला आले. चाळीच्या एका खोलीत भिवाचा अभ्यास होत नसल्याने स्वत: रामजीबाबा रात्री २ वाजेपर्यंत जागे राहायचे. २ वाजता भिवाला झोपेतून ऊठवून अभ्यासाला बसवायचे आणि मगच झोपायचे. पुन्हा दिवसभर ते नानाविध नोकर्‍या किंवा अन्य काबाडकष्ट करायचे. केवळ भिवाच्या अभ्यासासाठी परवडत नसतानाही त्यांनी चाळीतली समोरची खोली घेतली. भिवामध्ये त्यांनी अभ्यासाची व वाचण्याची आवड निर्माण केली. भिवाने मागितलेले प्रत्येक पुस्तक ते त्याला आणून देत असत. स्वत:जवळ पैसे नसले तर आपल्या विवाहीत मुलींकडून त्यांचे दागिने उसने आणून ते गहाण ठेऊन त्यावर ते कर्ज काढीत पण पुस्तक आणून देत. प्रख्यात सत्यशोधक लेखक कृष्णाजी अर्जुन केळुसकर आणि दा.सा. यंदे यांच्या प्रयत्नातून भीमरावला सयाजीराव गायकवाड यांची स्कॉलरशीप मिळाली आणि ते पदवीधर झाले. शिष्यवृत्तीच्या अटी आणि शर्तींनुसार बडोद्यात काही वर्षे नोकरी करणे आवश्यक होते. त्यानुसार भीमराव नोकरीवर जायले निघाले तेव्हा रामजींनी त्यांना बडोद्याला जायला विरोध केला. सनातन्यांच्या गुजरातेत भीषण जातियता असल्याने आपल्या मुलाचा छळ होईल अशी साधार भिती त्यांना वाटत होती. ती पुढे खरीही ठरली. बडोद्यात भीमरावांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यांना राहायला घरही मिळाले नाही. कार्यालयातही त्यांचा पदोपदी अपमान करण्यात आला. भीमरावांनी बडोद्याला जाण्यासाठी घर सोडले त्याच दिवशी मुलाच्या काळजीने हा योद्धा पुरूष आजारी पडला आणि पंधरवड्याभरात त्यांचे २ फेब्रुवारी १९१३ ला दु:खद निधन झाले. वडील आजारी असल्याची तार मिळताच भीमराव मुंबईला यायला निघाले. वडीलांची आवडती मिठाई घेण्यासाठी ते सुरत रेल्वे स्टेशनवर उतरले आणि त्यांची ट्रेन सुटली. पुन्हा गाडी २४ तासांनीच होती. भीमराव घरी पोचले तेव्हा माझा भिवा आला म्हणून रामजींनी दोन आनंदाश्रू ढाळले आणि त्यांचे तात्काळ निधन झाले. जणू फक्त भिवाला पाहायला, भेटायलाच ते थांबले होते. 'असे होते रामजी म्हणून घडले ग्रंथप्रेमी भीमजी' हे आपण कधीही विसरता कामा नये.  


*

    

दलितमित्र कदम गुरुजी : स्वावलंबी विद्यार्थी ते ज्ञानयोगी एक प्रवास

 

दलितमित्र कदम गुरुजी : स्वावलंबी विद्यार्थी  ते ज्ञानयोगी एक प्रवास


दलितमित्र कदम गुरुजी

प्रा. डॉ. विधिन कांबळे

प्राणीशास्त्र विभाग, सांगोला महाविद्यालय, सांगोला 

संदर्भ: ज्ञानयोगी, दलितमित्र कदम गुरुजी: कार्य आणि विचार.  ले. डॉ. सौ. मिनाक्षी सुभाष कदम.


महाराष्ट्रात अनेक थोर समाजसुधारक होऊन गेले. ज्यांनी आपल्या अपूर्व  कर्तुत्वाने समाजातील दलितपिडीतव शोषित समाजाच्या उद्धाराचे कार्य केले आहे.  परंतु वास्तवात या थोर समाजसुधारकांना जीवनात अनेक संघर्षाना तोंड द्यावे लागले होते हे वास्तव नाकारता येणार नाही.  छ. शाहूमहाराज महात्मा फुलेडॉ. बाबासाहेब आंबेडकरकर्मवीर भाऊराव पाटीलइत्यादीचे जीवन चरित्र वाचल्यानंतर आपणास त्याची  जाणीव होते.  या समाजधुरीनी  महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाच्या समाजकारणाला गती देण्याचे कार्य केले आहे आणि आजही त्यांनी दिलेले विचार पदोपदी समाजाला दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरतात.. त्यांच्याच पावलावर पावूल  ठेऊन सामाजिक परिवर्तनाचे चक्र गतिमान करण्यासाठी अनेक थोर व्यक्तीनी दिलेल्या बहुमोल योगदानामुळेच  सामाजिक सुधारणेची गंगा तळागाळापर्यंत पोहचली  व रुजली  आहे.  त्यापैकीच एक दलितमित्र कदमगुरुजी हे होत. डॉ. सौ. मिनाक्षीताई सुभाष कदम लिखित ‘ज्ञानयोगी’ या गुरुजींच्या जीवनचरित्राचे वाचन केल्यानंतर त्यांच्या जीवनातील अनेक पैलूंचे दर्शन होते. गुरुजींचे जीवन हे अनेक संघर्षानी भरून पुरून उरले होते.त्यावर मात करून सन्मानाने कसे जगावे याचा मंत्र त्यांच्या चरित्रातून दिसून येतो. जीवनाच्या विविध टप्प्यावर केलेले संघर्ष आणि त्यावर केलेली मात ही त्या-त्या काळाची गरज होती असे दिसून येते. ज्ञानयोगी या पुस्तकामुळे गुरुजीचे कार्य मानवी कल्याणासाठी व उद्धारासाठी किती महत्वाचे होते याची जाणीव झाल्याशिवाय रहात नाही.  काही माणसं कर्तुत्वाने इतकी   मोठी असतात की  त्यांची उंची कोणत्याही  परिमाणामध्ये  मोजता येणे शक्य नाही. गुरुजींचे सपूर्ण जीवनच संघर्षमय  होते. त्यांनी विद्यार्थीदशेत केलेले संघर्ष हे आजच्या विद्यार्थ्यासाठी निश्चितच प्रेरणादाई  ठरतील.  कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीचे भांडवल करून अपयशाचे खापर आपल्या पालकांच्या माथ्यावर फोडून देशोधडीला लागलेले तरुण पहावयास मिळतात. अशा विद्यार्थ्यांनी गुरुजींचे चरित्र एकदा नव्हे दहादा वाचावे. गुरुजींचा विद्यार्थी दशेतील शिक्षणासाठीचा  संघर्ष मनाला चटका लावून जातो.  

कट-कारस्थानामुळे लहान ज्ञानोबाचे वडिलांचे छत्र हरपले होते. अशा अवस्थेत आपल्या बहिणीला आणि भाच्याचा घातपात होईल याने व्यथित होऊन त्यांचे मामा डिकसळला(आजोळी) घेऊन आले.  अचानक उद्भवल्या प्रसंगाने आई हवालदिल झाली होती. पण आज्जी आणि मामाने  खंबीर  साथ दिलीजगण्याचे बळ दिलेआणि आपल्या एकुलत्या एक  लेकराची आई व वडील अशी दुहेरी भूमिका पार  पाडण्यासाठी प्रोत्साहन दिले.  मामा आपल्या परिस्थिनुसार ज्ञानोबाचे लाड पुरवत होते. त्याबरोबरच त्यांचे शिक्षणही सुरु होते. आपल्या गावापासून जवळपास १० किमी चालत जाऊन हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले.  लहानपणापासुनच गुरुजी अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते.   हायस्कूलमध्ये शिकत असताना स्कॉलरशिप परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने पास झाले होते इतके ते हुशार व  बुद्धिमान होते.

कट-कारस्थानामुळे लहान ज्ञानोबाचे वडिलांचे छत्र हरपले होते. अशा अवस्थेत आपल्या बहिणीला आणि भाच्याचा घातपात होईल याने व्यथित होऊन त्यांचे मामा डिकसळला(आजोळी) घेऊन आले.  अचानक उद्भवल्या प्रसंगाने आई हवालदिल झाली होती. पण आज्जी आणि मामाने  खंबीर  साथ दिलीजगण्याचे बळ दिलेआणि आपल्या एकुलत्या एक  लेकराची आई व वडील अशी दुहेरी भूमिका पार  पाडण्यासाठी प्रोत्साहन दिले.  मामा आपल्या परिस्थिनुसार ज्ञानोबाचे लाड पुरवत होते. त्याबरोबरच त्यांचे शिक्षणही सुरु होते. आपल्या गावापासून जवळपास १० किमी चालत जाऊन हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले.  लहानपणापासुनच गुरुजी अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते.   हायस्कूलमध्ये शिकत असताना स्कॉलरशिप परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने पास झाले होते इतके ते हुशार व  बुद्धिमान होते.

ज्या काळात जाती-पातीच्या भिंती घट्ट होत्या त्या काळात उच्च-निचतेचा विचार त्यांच्या मनाला कधीच शिवला नाही उलट ते खालच्या समजलेल्या जातीतील विद्यार्थीमित्रांशी अत्यंत आपुलकीने व प्रेमाने वागत असत.गुरुजी विद्याथी दशेपासूनचअत्यंत संवेदनशील आणि वैचारिकवृत्तीचे होते.सोलपुरच्या दयानंद महाविद्यालयात शिक्षण घेत असताना मराठा बोर्डिंगमध्ये रहात असत.त्याच्या बरोबर खेड्या-पाड्यातून शिक्षण घेण्यासाठी आलेले अनेक गरीब मित्र होते.शालेय व दैनंदिन खर्चासाठी त्यांच्याकडे पैशे नसायचे. त्यांचे हाल अपेष्टा  पाहून गुरुजीच्या मनाला खूप वेदना व्हायच्या.आपल्या मित्रांची दैनिया अवस्था पाहून गुरुजीनाही गुदमरल्यासारखे व्हायचे. एक दिवस त्यांनी अशा मित्राच्याबरोबर स्वालंबी शिक्षण घेण्याचा विचार मांडला  व तो अमलातही आणला.सर्व मित्रांनी मिळून बिस्किटे विकून दैनंदिन व शालेय  खर्चासाठी लागणारे आर्थिक नियोजन केले.आपल्या मित्रांसाठी निस्वार्थी मदत करणारे, त्यांच्या मदतीला तळमळीने धावून जाणारे फारच थोडे थोडके मित्र असतात.  जवळपास ७०-८० वर्षापूर्वी गुरुजींनी परिस्थितीची जाणीव व कौटुंबिक जबाबदारीचे भान ठेवल्यास  आपण कोणत्याही संकटावर मात  करू शकतो. त्यासाठीनिर्धार व मानसिक तयारी ठेवावी लागते.  असा संदेश आपल्या कृतीतून आजच्या पिढीतील विद्यार्थ्यासाठी दिला आहे.

 म्याट्रिक मध्ये शिकत असतान शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी गुरुजींनी कापडगिरणीत काम करण्याचा निर्णय घेतला व त्यांनी काम हि केले. याचा व्हायचा तो झाला. कामातून वेळ न मिळाल्याने नापास होण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्याचा मोठा धक्का त्यांच्या मनाला बसला.  तर दुसऱ्या बाजूला आईला खूप आनद झाला. कारण लहानपणापासून घराबाहेर शिक्षणासाठी घराबाहेर पडलेला आपला मुलगा आता आपल्या जवळ राहील.नापास झाल्याचे शल्य विद्यार्थी असलेल्या गुरुजीना आतल्या आत सलत होते.  त्यातूनच त्यांनी परीक्षेचा फॉर्म भरण्याचा निर्धार केला. त्यांनी नुसताच फोर्म भरला नाही तर तितक्याच जोमाने अभ्यासही केला व चांगल्या गुणानी पास ही झाले. अपयशाने खचून न जाता पुन्हा प्रामाणिक प्रयत्न केले तर यश खेचून आणू शकतो हा धडा आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांना दिला आये.

त्या काळात भारतीय स्वातंत्र्याची चळवळ देशभरात गतिमान होत असताना त्याच कालावधीत गुरुजींचे सोलापूरात महावियालीन शिक्षण सुरु होते.   अनेक स्वातंत्र्य सेनानीशी त्यांचा संपर्क आला. त्यांचे विचार ऐकून गुरुजी खूप प्रभावित झाले.  स्वातंत्र्याच्या भावनेने प्रेरित विचारांचा प्रचंड प्रभाव गुरुजींच्या मनावर  पडला. देशभरात अनेक चळवळी सुरु होत्या. स्वतंत्र  प्राप्तीसाठी म. गांधीच्या असहकार चळवळीने देशभरात स्वातंत्र्याचे  वारे वाहू लागले होते म. गांधींच्या सत्यअहिंसाव सत्याग्रह या  विचाराने प्रभावित होऊन .  अनेक तरूणस्वातंत्र्य चळवळीत उडी घेत होते. तर दुसऱ्या  बाजुला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची दलित- शोषित समाजासाठी सामाजिक स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरु होती. याचा गुरुजींच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. आपल्या आईची व मामाची मनधरणी करून वकिलीच्या शिक्षणासाठी  कोल्हापूर येथे प्रवेश घेतला. छ. शाहूमहाराज  यांनी केलेले कार्य जवळून अनुभावाण्य्ची संधी त्यांना मिळाली होती. त्यातूनच महात्मा गांधीजींच्या राजकीय विचाराबरोबरच फुले, शाहू आंबेडकरांचे सामाजिक शैक्षणिक,व सामाजिक समतेची बीजे त्यांच्या मनात रुजल्याचे दिसून येतात. त्याचा परिणाम म्हणून त्यांनी वकिलीचा व्यवसाय करण्याऐवजी शैक्षणिक कार्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. त्यांच्या शैक्षणिक वाटचालीची पाळेमुळे विद्यार्थीदशेत गुरुजींनी प्रत्यक्षपणे अनुभवले होते. गरिबीचे चटके  कसे असतात याची  त्यांना जाणीव होती. गरीबीचे चटके त्यांनी सोसले होते. आपल्या गरीब मित्रांचे हाल त्यांनी प्रत्यक्ष पहिले होते.त्यांना माहित होते.  शिक्षण हे एकच असे माध्यम आहे. ज्या योगे मानवी मूल्याचा विकास होतो. कारण ते स्वतः अनुभवत होते.

मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो  तो तितकाच यशायाच्या शिखरावर जाऊन बसतो शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपुर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी महत्वाची असते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पितो तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो.एखाद्या व्यक्तीच्या जीवनात ध्येय निश्चित करुन शिक्षण वर्तमान आणि भविष्याकडे पोचते.आपण शिक्षणाशिवाय अपूर्ण आहोत आणि आपले जीवन व्यर्थ आहे. शिक्षण आपल्या जीवनात एक ध्येय ठेवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते असे शिक्षणाबद्दल आपले व्यापक  विचार यांनी मांडले आहेत. अशाच प्रकारचे विचार आदरणीय कदम गुरुजी यांच्या ठाई असल्याचे दिसून येतात. आदरणीय यशवंतराव चव्हाण यांचे गुरुजीवर विशेष प्रेम होते. शहरी भागात  विद्यार्थ्यांचे किती हाल होतात हे प्रत्यक्ष अनुभवल्यामुळे चव्हाणसाहेबांच्या पुढाकाराने कदमगुरुजींनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी शिक्षणाचे दालन निर्माण केले. आणि आंबेडकर यांनी मांडलेल्या विचाराप्रमाणे डरकाळी फोडणारे वाघ निर्माण केले आणि आजही त्यांनी निर्माण केलेल्या शाळामधून अविरत चालू आहे.  सवर्ण असूनही दलित, पिडीत, शोषित आणि वंचित घटकासाठी गुरुजींनी कार्य केले.  दबलेल्या पिचलेल्या समाजाचे तारणहार ठरतात. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने दलितमित्र आहेत. गुरुजींच्या अनेक पैली पैकी मला त्यांचे विद्यार्थी जीवन ज्ञानयोगी या चरित्रातून वाचावयास मिळाला. ते विचार आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांना खूप प्रेरणा देणारे आहेत. अशा महान ज्ञानयोगीना माझे विनम्र अभिवादन..

डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे स्त्रियांसाठी योगदान

डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे स्त्रियांसाठी योगदान